22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरनुकसानभरपाई पासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणार्‍या कृषी सहाय्यकांना निलंबीत करा

नुकसानभरपाई पासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणार्‍या कृषी सहाय्यकांना निलंबीत करा

पंढरपूर : ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष डाळिंब पिकांचे पुन्हा पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी व महाराष्ट्र शासनाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश असताना पंढरपूर तालुक्यातील बहुतांश कृषी सहाय्यकाने बेफिकिरीने कामकाज करून कोट्यावधी रुपये नुकसानभरपाई पासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे तरी अशा कृषी सहाय्यकांना तात्काळ निलंबित करावे या मागणी करता पंढरपूर तालुका कृषी अधिकारी श्रीयुत मोरे यांना घेरावा घातला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचे सभापती हरीश दादा गायकवाड उपसभापती राजू बापू गावडे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष व शेतकऱ्यांचे नेते प्रशांत भैया देशमुख भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर संतोष घोडके तानाजी पवार संतोष भिंगारे प्रमोद काका बाबर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते .

सुमारे एक तासभर तालुका कृषी अधिकारी यांना धारेवर धरले कामचुकार व बेजबाबदार कृषी सहाय्यकांना निलंबित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.

द्राक्ष बागातदार संघाचे अध्यक्ष प्रशांत भैया देशमुख यांनी सांगितले की पंढरपूर तालुक्यामधील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा अवकाळी पावसामुळे शंभर टक्के नुकसान ग्रस्त झाले आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे .

आत्महत्येच्या गरजेत असताना कृषी सहाय्यक व तलाठी ग्रामसेवक यांनी शासनाचे आदेश असताना सुद्धा पंचनामे न केल्याने किंवा नुकसानीची टक्केवारी कमी दाखवल्याने शेतकरी वंचित राहिले असून अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यावेळी बोलताना शेतकरी नेते माऊली हळणवार म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा पंढरपूर तालुक्यातील अनेक गावातील कृषी सहाय्यक हे गावागावात न जाता शासनाकडे नुकसान झाले नाही असा रिपोर्ट पाठवत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी वंचित राहिला आहे सदर कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करावी अन्यथा सरकार मध्ये असताना सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांची राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR