22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रउष्माघाताने भंडा-यात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

उष्माघाताने भंडा-यात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका घरात वृध्द दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहेत. ही घटना भंडा-याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी इथे उघडकीस आली आहे. मनोहर महागु निमजे (वय ८०) आणि पत्नी मीरा मनोहर निमजे (वय ७०) असे या मृतक वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत.

मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक
गाठला आहे. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृद्ध दाम्पत्याला लकवा, बीपी आणि शुगरचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मागील दोन दिवसांत तापमानाचा पारा वाढल्याने कदाचित उष्माघातानेही त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका उपस्थित केली आहे.

राज्यासह विदर्भात उष्णतेच्या पा-याने उच्चांक गाठला आहे. वाढते तापमान आणि उकाड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता सा-यांना पावसाची आतुरता लागली आहे. यंदा देशातील काही भागात उष्णतेच्या पा-याने विक्रमी तापमान गाठत नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. शुक्रवारी भंडा-यात ४६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील भंडा-याचे तापमान सर्वाधिक उच्चांकी ठरले. तर मागील अडीच वर्षातील भंडा-यातील तापमानाचा हा सर्वाधिक उच्चांक असून प्रखर उष्णतेने नागरिक आणि वन्यप्राण्यांचेही जीव होरपळून निघत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR