सोलापूर : प्रतिनिधी
पुणे सेवासदन संस्था, शाखा सोलापूर तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्याकरिता सेवासदन कलाकौमुदी अंतर महाविद्यालयीन युवती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ही समूह नृत्य स्पर्धा शुक्रवार दिनांक १६ डिसेंबर रोजी किलोस्कर सभागृह येथे संपन्न झाली. या स्पर्धेत, एकूण १५ संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये, वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाने सादर केलेल्या बॅक टू स्कूल या शालेय जीवनातील आठवणी, शालेय परीक्षा तणाव, व पालकांच्या अपेक्षा या थीमवर आधारित समूह नृत्यांमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
अकरावी विज्ञान शाखेतील दिया सोनकांबळे, सोनम हौजी, आदिती शेळके, महालक्ष्मी बोमेन, सारा सोनी, लक्ष्मीपुरा बुरा, श्रुती बोयनाल, हर्षदा जानगवळी, सृष्टी मेंथे या स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते, प्रमाणपत्र, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले. त्यांना, चंद्रशेखर कस्तुरे, चेतन तुपकर यांनी मार्गदर्शन केले.