परभणी : येथील सुयोग इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्रेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध मराठी, हिंदी चित्रपटातील भक्ती गीत, शेतकरी गीत, देशभक्तीपर गाण्याच्या तालावर बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
या स्रेहसंमेलनाचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे, प्रमुख पाहुणे ऍड.राजकुमार भांबरे, गजानन डहाळे, पुष्पा मुंढे उपस्थित होते. यावेळी वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण व ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदक मिळवणा-या संग्राम राम कदम, आदित्य अरविंद डोंगरे, श्रेयस श्रीराम किरवले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित घेण्यात आलेल्या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेती श्रद्धा नवनाथ दराडे, द्वितीय भाग्यश्री विशाल नागनाथवार व तृतीय ज्योती गोविंद रेंगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात बेस्ट स्टुडंट ऑफ द ईयर अवॉर्ड देऊन साईनाथ मिथुन सोनुने व रिद्धी कृष्णा रेंगे यांचा गौरव करण्यात आला. तसेच बेस्ट पॅरेंट्स ऑफ द ईयर अवॉर्ड देऊन सुरेश राठोड व संगीता राठोड यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालकांनी सतत परस्परांच्या संपर्कात राहून एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन केले. ऍड. भांबरे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबतच विविध कलागुण संपन्न झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. मुंढे यांनी नवीन शैक्षणिक धोरणा नुसार शाळेत सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी सतत प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सिद्धार्थ गवई, सूत्रसंचालन प्रताप संदलापूरकर, आभार सुचिता सोनूने यांनी मानले. यशस्वीतेसाठी आनंद झा, संदीप पांडे, सुकन्या मरगळ, संस्कृती फुटाने, ऋतुजा राऊत, शबाना अंजुम यांनी प्रयत्न केले.