23.6 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeपरभणीसामुदायिक विज्ञान महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियान

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियान

परभणी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने सामुदायिक विज्ञान महाविद्यालय वनामकृवि येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. तसेच दि. २ ऑक्टोबर राष्ट्रीय स्वच्छता दिवस म्हणून पाळण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्त परिसर तसेच गाजर गवत निर्मूलन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छता अभियानाच्या प्रारंभी मा.संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. उदय खोडके यांनी स्वच्छता ही सेवा अभियान यावर्षी स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता या घोषवाक्यावर आधारित असून स्वच्छतेला आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातही अतिशय महत्व असल्याने त्याचे पालन होणे आवश्यक आहे. आज प्लास्टिकचा अतिरिक्त वापर पर्यावरणाच्या -हासास कारणीभूत ठरत असून प्लास्टिक निर्दालनाचे काम त्याचा अतिरेकी वापर टाळून सजगपणे करावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मा. संचालक विस्तार शिक्षण डॉ. भगवान आसेवार यांनी अस्वच्छतेमुळे पर्यावरणामध्ये हानिकारक वायूंची निर्मिती होत असून त्यामुळे पर्यावरणास बाधा पोहोचून त्याचा सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात स्वच्छता ही आपल्या स्वभावातच भिनली जाणे महत्वाची असून ती सर्वत्र राखण्याबाबत प्रत्येकाने संवेदनशील बनले पाहिजे असे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी विषद केले. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, विभाग प्रमुख डॉ. विजया पवार डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी (रासेयो) डॉ. विद्यानंद मनवर यांनी केले. कार्यक्रमात रासेयो स्वयंसेवकासमवेत महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचा-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR