नाशिक : उन्हाळ्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघातामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. त्यातच आता नाशिककरांची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे.
स्वाईन फ्लूची लागण झाल्यानंतर सिन्नरच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, आणखी तीन रुग्ण समोर आले आहेत. स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
तापमानात वाढ होत असताना स्वाईन फ्लूच्या संसर्गातही वाढ होते. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. सिन्नरमध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोन जणांवर नाशिक शहरात उपचार सुरू आहेत. सध्या या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र तरीही आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि शीतपेये पिताना सावधानी बाळगा, असे अवाहन करण्यात येत आहे.