16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयमहिलेकडून कुटुंबातील सदस्यांचे प्रतिकात्मक दहन

महिलेकडून कुटुंबातील सदस्यांचे प्रतिकात्मक दहन

दस-याला रावनाऐवजी जाळला नवरा, सासू-सास-यांचा पुतळा

हमीरपूर : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, दस-याच्या दिवशी संध्याकाळी एका महिलेने रावणाचा पुतळा जाळण्याऐवजी पती, सासू-सासरे आणि नणंदेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे.

शनिवारी संपूर्ण देशभरात विजयादशमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा झाला. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मुस्करा परिसरात एका महिलेने आपला नवरा, सासू, सासरा आणि नणंदेचा फोटो चिकटवले आणि त्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मुस्करा परिसरात राहणा-या प्रियंकाचे लग्न चौदा वर्षांपूर्वी संजीव दीक्षितसोबत झाले होते. तिच्या नव-याचे आधीपासूनच त्याच्या बहिणीची मैत्रीण पुष्पांजली हिच्यासोबत अफेअर होते. त्यामुळेच संजीवने काही दिवसांनी प्रियंकाला सोडले आणि पुष्पांजलीसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला.

प्रियंकाला हा धक्कादायक प्रकार समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने याला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र सासू-सासरे आणि नणंदेने तिची बाजू समजून घेतली नाही. तिला त्यांची मदत झाली नाही. गेल्या १४ वर्षांपासून तिच्या आयुष्यात दु:ख आहे. न्यायासाठी ती वणवण भटकत आहे. दस-याच्या दिवशी त्यामुळेच तिने नव-याच्या घरासमोरच सासरच्या लोकांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. समाजातील रावणासारखे वागणा-या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे असा संदेश तिने या व्हीडीओतून देण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नाला १४ वर्षे उलटून गेली आहेत, तरीही वनवास संपलेला नाही असे प्रियंका दीक्षितने सांगितले.

योगी सरकारकडे मागितली मदत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे प्रियंकाने न्याय मिळावा म्हणून मदत मागितली आहे. प्रियंका म्हणाली की, योगी सरकार ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ मोहीम चालवत आहे आणि आज एका सुशिक्षित मुलीला वाचवले जात नाही. तसेच सरकारकडे न्याय मागत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR