16.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरपनाश प्रकरणी नगररचना विभागाच्या अहवालानुसार कारवाई करा : जामगुंडे

पनाश प्रकरणी नगररचना विभागाच्या अहवालानुसार कारवाई करा : जामगुंडे

सोलापूर – विजयपूर रोडवरील बहुचर्चित बेकायदा पनाश इमारत बांधकाम प्रकरणी नगररचना विभागाच्या अहवालानुसार कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणात गुंतलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी करण्यात यावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त आणि नगररचना उपसंचालक यांना जामगुंडे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पनाश या सतरा मजली इमारतीचे बांधकाम करताना अनियमितता झाली आहे. बेकायदेशीर बाबी झाल्या आहेत. याचे सविस्तर पुरावे ५ डिसेंबर २०२२ रोजी महापालिका आयुक्तांना दिले होते. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी सहायक संचालक नगररचना कार्यालयाकडून अहवाल मागविला होता. सहायक संचालक संभाजी कांबळे यांनी २३ ऑगस्ट २०२३ रोजी आयुक्तांना अहवाल सादर केला. पनाशच्या बांधकामात अनियमितता असल्याचे स्पष्ट मत त्यांनी अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल प्राप्त होऊन पाच महिने झाले तरी अद्याप आयुक्तांनी विकासकावर तसेच बांधकाम परवाना देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त पाठीशी घालत आहेत असा आरोप जामगुंडे यांनी केला.

महापालिका अधिकाऱ्यांनी रेरा चे नियम मोडून रिवाईज बांधकाम परवानगी दिली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. या योजनेमधील जागेच्या लेआऊटमध्ये दहा टक्के जागा ही नियमाने खुली असताना विकासकाने ती जागा नवीन बांधकामासाठी वापरली. खुली जागा हडप करून महापालिकेची फसवणूक केली आहे, असा आरोप जामगुंडे यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR