39.1 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeमहाराष्ट्रपीओके ताब्यात घ्या

पीओके ताब्यात घ्या

रामदास आठवले यांची मागणी

लोणावळा : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. लोणावळा येथे विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रामदास आठवले म्हणाले, जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत, याकरिता माझी भारत सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात. त्यामुळे तो भाग भारतात घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानने देखील तो भाग सोडावा, नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, आमचे सरकार याविषयी गंभीर आहे, विरोधकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे असे आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, लोणावळा शहरातील विविध विकास कामांचा आढावा रामदास आठवले यांनी घेतला. यावेळी येथील पर्यटन विकासाला चालना देणा-या प्रकल्पांना निधी देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. दरम्यान, सध्या पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR