30 C
Latur
Sunday, June 1, 2025
Homeराष्ट्रीयनीट-पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या

नीट-पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या

सर्वोच्च न्यायालयाचे ‘एनबीई’ला आदेश मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : नीट-पीजी २०२५ च्या परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. नीटी-पीजी २०२५ ची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन्स(एनबीई) ला दिलेत. २ शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याच्या एनबीईचा निर्णय कोर्टाने फेटाळत हा मनमानी आणि विद्यार्थ्यांवर अन्यायकारक निर्णय असल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन्स(एनबीई) ला निर्देश देत म्हटले की, बोर्डाने पारदर्शकपणे परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची व्यवस्था करावी. १५ जूनला होणा-या परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी अद्यापही वेळ आहे. दुस-यांदा देण्यात आलेल्या सवलतीशी संबंधित मुद्यावर परीक्षा संपल्यानंतर विचार केला जाईल असे कोर्टाने सांगितले. जरी परीक्षा मंडळाने अधिक केंद्रे ओळखण्याचा संदर्भ दिला तरी त्याला अधिक वेळ लागू शकतो. ज्यामुळे परीक्षा आयोजित करण्यास विलंब होऊ शकतो आणि सर्व परिणामी केंद्र आणि प्रवेश इत्यादी गोष्टी या न्यायालयाने ठरवलेल्या वेळेच्या मर्यादेनुसार होणार नाहीत असा प्रतिवादींच्या वतीने एक युक्तिवाद मांडण्यात आला आहे. हा युक्तिवाद देखील फेटाळण्यात आला आहे.

मागील काही वर्षापासून नीट पीजीसारखी परीक्षा २ वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जात होत्या. मात्र कोर्टाने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिकांची कठीण पातळी पूर्णपणे समान मानता येत नाही. ही परिस्थिती असमानता आणि मनमानी निर्माण करते. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे आवश्यक आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. कोर्टाच्या या निर्णयामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व उमेदवार एकाचवेळी एकसारखेच प्रश्नावलीत परीक्षा देऊ शकतात ज्यामुळे ही परीक्षा पद्धत निष्पक्ष आणि पारदर्शक होऊ शकते.

१५ जूनला प्रस्तावित नीट पीजी परीक्षा
परीक्षा वेळापत्रकानुसार, नीट पीजी २०२५ ची परीक्षा १५ जूनला आहे. याआधी परीक्षा २ शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली होती. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बोर्डाला नव्याने परीक्षा कार्यक्रम जारी करावा लागणार आहे. एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR