21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीविकासकामे घरोघरी पोहोचविण्यात पुढाकार घ्या : आ. डॉ. गुट्टे

विकासकामे घरोघरी पोहोचविण्यात पुढाकार घ्या : आ. डॉ. गुट्टे

गंगाखेड : सर्वसामान्य लोकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात नेहमी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मतदारसंघात समाधानकारक कामगिरी करता आली आहे. आजपर्यंत एवढा निधी कधीच आला नाही असे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत. ही आपल्या कामाची पावती आहे. परंतू ही सगळी विकासकामे घरोघरी पोहोचविण्यात पुढाकार घ्या. तेव्हाच लोकांना आपले योगदान कळेल. हे लक्षात घेवून लोक संवादाचे नियोजन करा, असे आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी पदधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

मौजे. बनपिंपळा येथील आ.डॉ.गुट्टे यांच्या निवासस्थानी अनेक कार्यकर्त्यांनी मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रवेशकर्त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य विनायक आडे, माजी सरपंच माणिक जाधव, माजी सरपंच रोहिदास राठोड, सोसायटी सदस्य श्रीपती राठोड, रामपूर तांडाचे विनायक राठोड, पायरिका तांडाचे बाबुराव राठोड, रेखा तांडाचे नागोराव राठोड, पिराचा तांडाचे बंडू राठोड, मुकदम बाबु राठोड यांनी मित्र मंडळात प्रवेश केला आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील विकास कामांची घौडदौड पाहून अनेक कार्यकर्ते व नागरिक जोडले जात आहेत. त्यामुळे त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्याची मोठी जबाबदारी आहे, असे आ. डॉ. गुट्टे यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे, रासप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप आळनुरे, प्रभारी हनुमंत मुंढे, प्रमोद राठोड, बबन चव्हाण, अनिल राठोड, बालाजी राठोड, संदीप राठोड उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR