अकोला : येथील तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यकरत असलेले शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेत आपले जीवन संपविले आहे.
तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसअपवर स्टेटस ठेवले होते. यात त्यांनी त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहिले आहे. आपली पत्नी आपला मानसिक छळ करत असल्याचे तसेच अश्लील शिव्या देत असल्याचे शिलानंद तेलगोटे यांनी स्पष्ट लिहिल्याचे दिसून आले आहे. तसेच माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असेहीह तेलगोटे यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी शिलानंद तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तलाठी शिलानंद तेलगोटे यांचा मृतदेह तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास शवविच्छेदानाच्या रीपोर्टवर अवलंबून असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मृत्यूपत्र देखील तयार केले असल्याचे समोर आले आहे. यात त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली असल्याचे समजते.