नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही देशाला टॅरिफमधून सूट दिली जाणार नसल्याचं म्हटलं. 90 दिवसांच्या कालावधीसाठी टॅरिफला स्थगिती देण्यात आली आहे, त्यामधील वस्तूंवर पुढील काळात टॅरिफमधून स्थगिती नसेल. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की टॅरिफसाठी कोणताही अपवाद जाहीर करण्यात आलेला नाही, कोणत्याही देशाला सूट दिली जाणार नाही. चीनमध्ये निर्मिती झालेल्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स या सारख्या वस्तूंवर अजिबात सूट दिली जाणार नाही. सुरुवातीला वाढत्या किमती नियंत्रित करण्यासाठी सूट दिली गेली होती, असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प पोस्ट फॉर्म हिज ट्रथ सोशल या अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली. ट्रम्प म्हणाले की इतर देशांकडून आमच्या देशाविरुद्ध अयोग्य व्यापार संतुलन आणि अवित्तीय टॅरिफला उत्तर रोखण्यासाठी दुसरा उपाय नाही. चीननं आतापर्यंत आमच्यासोबत चुकीचा व्यवहार केला आहे. शुक्रवारी टॅरिफमधून कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. अमेरिका इलेक्ट्रॉनिक्सच्या पुरवठ्यासाठी सप्लाय चेन निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी सेमीकंडक्टर क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा व्यापार चौकशी सुरु करण्यात आली आहे.
अमेरिका देशांतर्गत पातळीवर अधिक उत्पादन करण्यासाठी आणि विदेशी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी लक्ष केंद्रीत करत आहे. प्रामुख्यानं चीन सारख्या देशांवरील अवलंबित्व कमी करायचं असल्याचं ते म्हणाले.
व्हाइट हाऊसकडून शुक्रवारी परस्पर शुल्कातून काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना टॅरिफमधून वगळण्यात आलं होतं. ज्यामुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संघर्षावर मार्ग निघेल असा अंदाज तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग जगतातून वर्तवला जात होता. मात्र, वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी स्पष्ट केली की चीनमधून येणा-या तंत्रज्ञान उत्पादनं, सेमीकंडक्टरवर दोन महिन्यात नव्या करांचा सामना करावा लागेल. हे कर ट्रम्प टॅरिफ पेक्षा वेगळे असतील.