22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeउद्योगटाटा करणार आता हेलिकॉप्टर्सची निर्मीती

टाटा करणार आता हेलिकॉप्टर्सची निर्मीती

नवी दिल्ली : टाटा समूह आणखी एका उद्योगात पाय रोवण्यासाठी तयार आहे. टाटा समूहाने विमान आणि हेलिकॉप्टर निर्मिती कंपनी एअरबस सोबत करार केला आहे. मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी आता एअरबस कंपनी आता टाटा समूह यांच्यात करार पार पडला आहे. फ्रान्सची जेट निर्माती कंपनी एअरबस टाटा समूहासोबत देशातील हेलिकॉप्टरसाठी अंतिम असेंब्ली लाइन सेट करण्यासाठी भागीदारी करत असल्याचे एअरबस हेलिकॉप्टर्सने जाहीर केले आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे. भारतातील उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

टाटा कंपनी आता एअरबस कंपनीसोबत मिळून हेलिकॉप्टर्स निर्मिती करणार आहे. ऋअछ भारतासाठी त्यांच्या नागरी श्रेणीतून एअरबसचे सर्वाधिक विकले जाणारे एच १२५ हेलिकॉप्टर तयार करेल. त्यामुळे आता एअरबस हेलिकॉप्टर्स मेड इन इंडिया असतील. इतकंच नाही तर टाटा हे हेलिकॉप्टर्स शेजारील देशांमध्ये निर्यातदेखील करेल. प्रजासत्ताक दिनानिमित्त परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी या कराराची घोषणा केली आहे. एअरबस आणि टाटा समूहाने संयुक्तपणे युरोपियन विमान निर्माती कंपनी एअरबसच्या एच १२५ सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे.

गुजरातच्या वडोदरा येथे व्यावसायिक वापरासाठी फायनल असेंब्ली लाइन सेट करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत, गुजरातमधील वडोदरा येथे अंतिम असेंब्ली लाइन तयार केली जाईल, जिथे टाटा समूह आणि एअरबस संयुक्तपणे एअरबसचे एच १२५ सिंगल इंजिन हेलिकॉप्टर तयार करतील.

या वर्षीपासून ही सुविधा सुरू होणार
३६ एकरांवर पसरलेला एफएएल २०२४ च्या मध्यापर्यंत तयार होईल आणि नोव्हेंबर २०२४ पर्यंत काम सुरू होईल. एफएएल हैदराबादमध्ये एअरबसच्या मेन कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली लाईनवर उत्पादित केलेले भाग वापरेल आणि अंतिम असेंब्लीसाठी वडोदरा येथे पाठवले जातील. या कराराअंतर्गत ४० सी-२९५ वाहतूक विमानेही तयार करण्यात येतील, याची देखरेख टीएएसएल करेल.

वडोदरामध्ये असेंबलिंग होणार
हैदराबादमधील एअरबसच्या मुख्य घटक असेंब्ली लाईनवर विमानाचे भाग तयार केले जातील. ३६ एकरांवर असेंबली लाईन बांधली जाणार आहे. २०२४ वर्षाच्या मध्यापर्यंत असेंबली लाईन तयार होईल आणि नोव्हेंबर २०२४ पासून तेथे कामाला सुरुवात होईल. तेथून हेलिकॉप्टरचे भाग तयार करून वडोदराला पाठवले जातील. वडोदराच्या असेंब्ली लाईनमधील पार्ट्स जोडून हेलिकॉप्टर बनवलं जाईल. करारानुसार, वडोदरा-आधारित असेंब्ली लाइनमध्ये किमान ४० सी २९५ वाहतूक विमाने देखील तयार केली जातील.

हेलिकॉप्टरची निर्यातही केली जाणार
ही भारतातील खासगी क्षेत्रातील पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा असेल. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी याबद्दल सांगितलं की, या सुविधेमध्ये जगातील सर्वाधिक विकल्या जाणा-या एअरबस एच १२५ सिंगल इंजिन हेलिकॉप्टरची अंतिम असेंब्ली लाइन असेल. एअरबसच्या सहकार्याने या सुविधेमध्ये निर्मित एच १२५ सिंगल इंजिन हेलिकॉप्टर भारतात वापरले जातील आणि त्यांची निर्यातही केली जाईल.

भारतात मोठी मागणी
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सध्या भारतात अशा ८०० हेलिकॉप्टरची तात्काळ मागणी आहे. ही मागणी मोठी मालमत्ता असलेल्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून या हेलिकॉप्टर्सला मोठी मागणी आहे. टाटा आणि एअरबस यांच्यातील करारामुळे ही मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR