मुंबई : देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस) बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने कंपनीला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अमेरिकन आयटी सेवा फर्म डीएक्ससीच्या ट्रेड सिक्रेटचा गैरवापर केल्याबद्दल अमेरिकन कोर्टाने टीसीएसवर १९४ मिलियन डॉलर्स, म्हणजेच १६२० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. स्वत: कंपनीने ही माहिती दिली आहे.
टीसीएसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीवर लावण्यात आलेला दंड १९४.२ मिलियन डॉलर्स जास्त आहे. यामध्ये $५६१.५ मिलियन कम्पनसेटरी डॅमेज, $११२.३ मिलियन एक्झेम्पलरी डॅमेज आणि $२५.८ मिलियन प्रीजजमेंट इंटरेस्टचा समावेश आहे. भारतीय चलनात दंडाची एकूण रक्कम अंदाजे १,६२२ कोटी रुपये आहे.
दंड का ठोठावला?
२०१८ मध्ये टीसीएसला वर विमा कंपनी ट्रान्सअमेरीकाकडून $२.५ अब्ज किमतीचे काम मिळाले होते. या करारानुसार ट्रान्सअमेरिकाच्या १० मिलियन ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा पुरवल्या जाणार होत्या. पण, गेल्या वर्षी जूनमध्ये हा करार रद्द करण्यात आला. दरम्यान, आता कंपनी न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहे.