अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील इयत्ता पहिली ते बारावीला शिकविणा-या टप्पा एक मध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षण विभाग पंचायत समिती अक्कलकोट यांच्यावतीने मंगरुळे प्रशाला अक्कलकोट येथे या पाच दिवशीय प्रशिक्षण चालू आहे. या या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २९ जुलै २०२० पासून लागू करण्यात आलेले आहे. प्रत्येक मुल शिकलं पाहिजे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्यासाठी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजन केलेले आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत व शालेय स्तर, क्षमता आधारित अध्ययन व अध्ययन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना, समग्र प्रगतीपत्रक,विचारप्रवर्तक प्रश्न, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा(स्कॉप) अशा १५ घटकांचा समावेश आहे. हे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सोमशेखर स्वामी बसय्या हिरेमठ,परमेश्वर व्हसुरे, जीवराज खोबरे इंद्रजीत पवार सुरेश पिरगोंडे शरद कुंभार गोविंद राठोड गणेश अंबूरे, तुकाराम जाधव, संगमेश्वर निंगदले अविनाश मोरे देविदास गुरव, सिद्धाराम करपे, ज्ञानेश्वर केंद्रे, दत्ता सावंत, प्रकाश फुगटे, महांतेश भंडारकोटे सैदप्पा कोळी यांनी काम पाहिले.