36.8 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeपरभणीपरभणीत शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या

परभणीत शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या

परभणी : राज्यात बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण गाजत असतानाच परभणीत अशाच बोगस शिक्षक भरतीने एका शिक्षकाचा बळी घेतला आहे.

श्री नरसिंह प्राथमिक शाळा मंगरूळ ता. मानवत येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सोपान उत्तमराव पालवे(३५) रा. आडगाव दराडे ह.मु. विकास नगर परभणी यांनी पेडगाव परीसरात दि. १७ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपबिती सांगितली आहे. या चिठ्ठीत संस्थाचालकाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेमुळे परभणीत मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सागर सोपान पालवे यांनी फिर्याद दिली असून यात नमूद करण्यात आले आहे की, त्यांचे पती सोपान पालवे यांनी श्री नृसींह प्राथमीक शाळा मंगरूळ ता. मानवतचे सचिव बळवंत मधुकर खळीकर यांना शाळेवर शिक्षक म्हणून घेण्याकरीता विस लाख रुपये दिले होते. त्यानंतर शाळेच्या संच मान्यतेकरीता आणखी ५ लाख रुपये देण्यासाठी सतत पैशाची मागणी करीत मानसीक त्रास दिल्यामुळेच पती सोपान पालवे यांनी पाथरी रस्त्यावरील पेडगाव परीसरात झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सागर पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिव बळवंत मधुकर खळीकर रा. परभणी यांच्या विरूध्द पोनि.डोंगरे यांचे आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी खळीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालवे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोनि.डोंगरे, सपोनि. हराळे, पोउपनि.तावडे, सपोउपनि. कनाके यांनी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणाचा तपास पोउपनि. तावडे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR