27.7 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक

टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक

दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 48.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने 267 धावा केल्या. विराट कोहली हा या विजयाचा नायक ठरला. तसेच श्रेयस अय्यरसह इतरांनीही विजयात निर्णायक योगदान दिलं. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने या विजयासह 2023 वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा वचपाही घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR