22 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाच्या जोडीने इतिहास रचला

टीम इंडियाच्या जोडीने इतिहास रचला

जोहान्सबर्ग : जोहान्सबर्गच्या मैदानात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी चौकार-षटकारांची अक्षरश: बरसात केली. एका बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खांदे पडले होते दुस-या बाजूला संजू आणि तिलक या दोघांमध्ये शतक आधी कोण करणार अशी जणू स्पर्धाच सुरु होती. संजू सॅमसन याने दोन भोपळ्यानंतर ५१ चेंडूत शतक साजरे केले.

एका वर्षात ३ टी-२० शतक झळकवणार तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्यापाठोपाठ तिलक वर्माने ४१ चेंडूत सलग दुसरे शतक झळकावले. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात दोन शतक झळकवण्याचा खास विक्रम या भारतीय जोडीने सेट केला आहे.

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी तुफान फटकेबाजी करत अनेक विक्रम नोंदवले आहेत. दोघांनी टीम इंडियाकडून सर्वांत मोठी भागीदारी रटण्याचा विक्रम केला. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये टॉप १० टीममधील ही पहिली जोडी ठरली आहे. ज्यांनी एकाच टी-२० सामन्यात शतकी खेळी करून दाखवलीये.

अन्य कोणत्याही फलंदाजांना जमलं नाही ते या जोडीनं करून दाखवलं आहे. हे विक्रम सेट करण्याआधी दोघांच्या फटकेबाजीत दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातील बारतीय संघाच्या विक्रमी धावसंख्येचीही नोंद झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR