27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव, मालिका बरोबरीत

ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव, मालिका बरोबरीत

मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुस-या टी-२०सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ६ विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १३०-८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने १९ व्या ओव्हरमध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरी हिने सर्वाधिक नाबाद ३४ धावा केल्या. तर टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हिने दोन विकेट घेतल्या. तीन सामन्यांच्या मालिका आता १-१ ने बरोबरीत सुटले आहेत.

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फंलादाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्या टी-२० मध्ये शफाली वर्मा आणि स्मृती मंधानाची बॅट तळपलेली सर्वांनी पाहिली होती. मात्र दुस-या सामन्यात दोघींनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. शफाली वर्मा १ धाव, जेमिमाह रॉड्रिग्स १३ धावा, हरमनप्रीत कौर ६ धावा या फेल गेल्या. दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर स्मृती मंधाना आणि रिचा घोष यांनी २३ धावा केल्या. टीम इंडियाचा या कमी धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग केला.

ऑस्ट्रेलियाने संघाकडून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी कडक सलामी दिली. दोघींनी पॉवरल प्लेमध्ये सुरूवातीला चांगली बॅटींग केली होती. ५१धावांवर एलिसा हिली २६ धावांवर असताना मोठ्या फटका मारण्याच्या नादात ती आऊट झाली. श्रेयांका पाटील शानदार कॅच घेतला. दीप्तीनेच दुसरा झटका देत बेथ मुनी हिला २० धावांवर माघारी पाठवले. श्रेयांक पाटीलने ताहलिया मॅकग्रा आऊट करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला.

ऑस्ट्रेलियाच्या सामन्यातून हा सामना सुटत चालला असे वाटत असताना एलिस पेरीने आक्रमक नाबाद ३४ धावांची खेळी केली. तर फोबी लिचफील्डने नाबाद १८ धावा केल्या. दोघांनी केलेल्या भागीदारीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR