23.3 C
Latur
Tuesday, July 15, 2025
Homeक्रीडाटीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान

टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान

लंडन : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या तिस-या सत्रातील खेळात भारतीय संघाने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १९२ धावांत आटोपला आहे. पहिल्या डावात दोन्ही संघांनी ३८७ धावांची बरोबरी साधली होती. त्यामुळे टीम इंडियासमोर लॉर्ड्सची कसोटी जिंकण्यासाठी फक्त १९३ धावांचे आव्हान मिळाले आहे. दुस-या डावात टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने घेतलेल्या विकेट्समध्ये जो रुट, जेमी स्मिथ आणि बेन स्टोक्स या महत्त्वपूर्ण विकेट्सचा समावेश होता.

सलामीवीर झॅक क्रॉउली आणि बेन डकेट यांनी बिन बाद २ धावांवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. इंग्लंडच्या धावफलकावर अवघ्या २२ धावा असताना बेन डकेटच्या रुपात मोहम्मद सिराजनं टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. तो १२ चेंडूत १२ धावा करून तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ओली पोपलाही सिराजने अवघ्या ४ धावांवर तंबूत धाडले. झॅक क्राउलीच्या रुपात नितीश रेड्डीने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. इंग्लंडचा सलामीवीर २२ धावा करून बाद झाला. आकाश दीपने लंच आधी हॅरी ब्रूकला माघारी धाडले. इंग्लंडच्या संघाने दुस-या डावात अवघ्या ८७ धावांवर आघाडीचे चार गडी गमावले होते.

आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर जो रुट आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ही जोडी जमली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागादीरी रचली. रुटला ४० धावांवर बोल्ड करत वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने जेमी स्मिथ ८(१४), बेन स्टोक्स ३३ (९६) या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. शोएब बशीरच्या रुपात चौथी विकेट्स घेत त्याने इंग्लंडच्या संघाला दुस-या डावात १९२ धावांवर रोखले. जसप्रीत बुमराहनं क्रिस वोक्स १० (३३) आणि ब्रायडन कार्सच्या १(४) च्या रुपात दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR