लंडन : भारत-इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात रंगला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एजबॅस्टनच्या मैदानातील ऐतिहासिक विजयासह लीड्सच्या मैदानातील पराभावची परतफेड करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
शुबमन गिलने बर्मिंगहॅमच्या मैदानात कसोटी कर्णधाराच्या रुपात विजयाचे खाते उघडले. पण तिस-या सामन्यात टॉस जिंकण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. टॉस वेळी सलग तिस-यांदा त्याच्या पदरी निराशा आली. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या नावे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला.
शुबमन गिलने लॉर्ड्सच्या मैदानातील सामन्यात टॉस गमावताच टीम इंडियाच्या नावे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा नकोसा वर्ल्ड नावे झाला आहे. ३१ जानेवारी २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत भारतीय संघाने टी-२०, वनडे आणि कसोटीत मिळून सलग १३ वेळा टॉस गमावला आहे. याआधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या नावे होता. कॅरेबियन संघाने २ फेब्रुवारी १९९९ ते २१ एप्रिल १९९९ या कालावधीत सलग १२ वेळा टॉस गमावला होता.