28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमनोरंजन‘शैतान’चा टीझर रिलीज

‘शैतान’चा टीझर रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण साऊथची ब्युटी ज्योतिका आणि आर. माधवनसोबत ‘शैतान’ घेऊन आला आहे. या चित्रपटाची खूप चर्चा होताना दिसत आहे. आता या चित्रपटाची पहिली झलक म्हणजेच टीझर रिलीज झाला आहे.

या टीझरला नेटक-यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ते या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एवढेच नाही तर २०२४ चा हा ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचे चाहत्यांनी सांगितले.
अजय देवगणने सोशल मीडियावर ‘शैतान’चा टीझर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, तो तुम्हाला विचारेल… हा एक खेळ आहे, तुम्ही खेळाल का? पण त्याला फसवू नका!

‘शैतान’चा टीझर आला आहे. हा टीझर शेअर केल्यानंतर एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘शैतान’ हा टीझर नाही, तो अंगावर काटा आणणारा आहे. आणखी एका यूजरने लिहिले, अरे गॉड रेकॉर्ड ब्रेक ब्लॉकबस्टर चित्रपट. तिस-या यूजरने लिहिले, काय टीझर आहे..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR