उड्डाणापूर्वीच विमानात तांत्रिक बिघाड

नांदेड : प्रतिनिधी
नांदेडहून गाझियाबादकडे जाणा-या स्टार एअरच्या विमानात मंगळवारी सकाळी उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड आढळून आल्याने प्रवाशांची चांगलीच धाकधूक उडाली. विमानातील बिघाड लक्षात येताच विमानात बसलेल्या प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला आणि त्यानंतर विमानाने गाझियाबादच्या दिशेने उड्डाण केले.

मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी सकाळी स्टार एअरचे विमान बंगळुरूहून नांदेड विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर याच विमानाने नांदेडहून गाझियाबादच्या हिंडन विमानतळाकडे जाण्याचे नियोजन होते. विमान (क्रमांक एस ५- १८७) ही नांदेड-गाझियाबाद मार्गावरील नियमित सेवा आहे. उपलब्ध विमान वेळापत्रकानुसार नांदेडहून हिंडनकडे दररोज थेट विमानसेवा उपलब्ध असून या मार्गाचे अंतर सुमारे १,०६० किलोमीटर आहे. उड्डाणाचा नियोजित कालावधी साधारण एक तास ५० मिनिटांचा आहे.

मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी सकाळी विमान नांदेड विमानतळावर आल्यानंतर गाझियाबादला जाणारे प्रवासी विमानात दाखल झाले होते. उड्डाणाची तयारी सुरू असतानाच विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका पत्करू नये म्हणून विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यामुळे विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विमान उड्डाण घेण्यापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आल्याने प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली. विमानसेवा खोळंबल्याने प्रवाशांना विमानतळावरच प्रतीक्षा करावी लागली. नियोजित वेळेत विमान रवाना न झाल्याने काही प्रवाशांनी विमानसेवेच्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिघाड दूर
विमानातील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी तांत्रिक कर्मचा-यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास ३ तासांच्या प्रयत्नानंतर विमानातील बिघाड दुरुस्त करण्यात आला. आवश्यक तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमान उड्डाणासाठी सज्ज करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना पुन्हा विमानात बसविण्यात आले आणि विमानाने गाझियाबादच्या हिंडन विमानतळाच्या दिशेने उड्डाण केले.

नांदेड विमानतळावर वाढती हवाई कनेक्टिव्हिटी
नांदेड विमानतळावरून सध्या विविध शहरांकडे विमानसेवा उपलब्ध आहे. स्टार एअरच्या वेळापत्रकात नांदेडहून गाझियाबाद, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, गोवा, नागपूर आदी शहरांसाठी सेवा नमूद आहे. नांदेड-गाझियाबाद मार्गावर( एमबे्रअन ई १७५) प्रकारच्या विमानाची सेवा उपलब्ध असल्याचे विमान कंपनीच्या वेळापत्रकात नमूद आहे. नांदेड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू असल्याने मराठवाड्यातील प्रवाशांसाठी दिल्ली-एनसीआरसह विविध शहरांशी हवाई संपर्क सुलभ झाला आहे. मात्र, मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी उड्डाणापूर्वी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|लातूरमध्ये दुष्काळाची छाया; सोयाबीन पिकाची पाहणी करत माजी आमदार धीरज देशमुख आक्रमक
03:57
Video thumbnail
Latur|सलगऱ्यात ९२ फुटी भव्य अस्थी विसर्जन घाट! देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ मोठा प्रकल्प
04:51
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:07
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13

Latest news