बार्सिलोना : टेक्नो ही कंपनी मोबाईल क्षेत्रात हळू-हळू आपला जम बसवत आहे. यासोबतच इतर टेक गॅजेट्स बनवण्यातही ते मागे नाहीत हे यंदाच्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये स्पष्ट झाले. बार्सिलोनामध्ये होत असलेल्या या टेक फेस्टमध्ये टेक्नोने चक्क एक रोबोटिक डॉग सादर केला आहे. हा रोबोट अगदी ख-या श्वानाप्रमाणेच हालचाली करतो, आणि उड्याही मारतो हे विशेष!
एमडब्ल्यूसी २०२४ मध्ये डायनामिक-१ हा रोबोटिक डॉग सादर केला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून तयार करण्यात आलेला हा रोबोट ब-याच गोष्टी करू शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या रोबोटला स्मार्टफोन, रिमोट कंट्रोल, व्हॉईस कमांड आणि इतर कित्येक पद्धतींनी कंट्रोल करता येते.