24.6 C
Latur
Tuesday, September 24, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलकांनी तहसीलदारांची पेटवली खुर्ची

मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची पेटवली खुर्ची

छ. संभाजीनगर/फुलंब्री : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांची खुर्ची बाहेर काढून आवारातच ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत दोघांनी जाळल्याची घटना आज, मंगळवारी ( दि. २४ ) सकाळी घडली. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचा-यांची एकच धावपळ उडाली.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. जरांगे यांची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. सरकारकडून मागण्या पूर्ण होत नाहीत आणि जरांगे यांची तब्येत खालावल्याने मराठा समाजात असंतोष आहे. अनेक जिल्ह्यांत बंद पाळून सरकारचा निषेध करण्यात आला. यातच फुलंब्री येथे मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात आज सकाळी आंदोलन करण्यात आले. साबळे आणि इतर एकाने थेट तहसीलदार यांच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणत तहसील कार्यालय परिसरात पेट्रोल टाकून खुर्ची पेटविण्यात आली.

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे हे आपल्या दोन सहका-यांसोबत सकाळी साडेदहाच्या दरम्यान तहसील कार्यालयात आले. तहसीलदार यांच्या दालनात कोणी नसल्याने त्यांनी खुर्ची बाहेर काढली. इमारतीच्या समोर पेट्रोल टाकून खुर्ची पेटवून दिली. त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी केली. अचानक ही घटना घडली. यावेळी काही कर्मचारी तिथे उपस्थित होते. त्यांनी काही विरोध केला नाही. त्यानंतर काही वेळात मंगेश साबळे आपल्या सहका-यांसोबत निघून गेले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR