पत्नीला ‘जा मर’ म्हणणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही

अलाहाबाद : पत्नीला जा आणि मर बोलणे म्हणजे नेहमीच आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असा महत्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. केवळ मृत व्यक्तीने आत्महत्या केली म्हणून आरोपीला दोषी धरता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने पतीला निर्दोषमुक्त करत ७ वर्षाची शिक्षा रद्द केली.

भांडणादरम्यान रागाच्या भरात बोललेले शब्द आणि कायदेशीररीत्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे यात फरक आहे. अशा शब्दांचा वापर कोणत्या परिस्थितीत, कोणत्या मानसिकतेत केला गेला, हे तपासणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी आरोपीचा गुन्हेगारी हेतू आणि त्याने प्रत्यक्षपणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठोस पुरावा आवश्यक आहे. केवळ कौटुंबिक छळ किंवा आत्महत्या घडली या तथ्यावरून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मयत महिलेचा २० वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी ट्रायल कोर्टाने पतीला दोषी ठरवून ७ वर्षांची कडक कारावासाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द करत पतीची निर्दोष मुक्तता केली. ट्रायल कोर्टाने केवळ आत्महत्येची घटना आणि सामान्य छळाच्या आरोपांच्या आधारे पतीला दोषी ठरवले असून हे कायद्यानुसार चुकीचे आहे असे मत न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यासाठी आरोपीचा स्पष्ट उद्देश किंवा त्या व्यक्तीला आत्महत्येस भाग पाडण्याची सक्रिय इच्छा असणे आवश्यक आहे. रागाच्या भरात किंवा वादादरम्यान तोंडातून निघालेले शब्द कोणत्याही गुन्हेगारी उद्देशाशिवाय बोलले जातात.

केवळ जा मर असे म्हणणे म्हणजे संबंधित व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी कोणतीही थेट चिथावणी किंवा प्रत्यक्ष मदत केल्यासारखे होत नाही. जोपर्यंत आरोपीने जाणीवपूर्वक अशी परिस्थिती निर्माण केली नाही, जिथे पीडित व्यक्तीकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नसेल, तोपर्यंत हा गुन्हा लागू होत नाही. प्रत्येक व्यक्तीची मानसिक क्षमता आणि संवेदनशीलता वेगळी असते.

शब्दांचा संदर्भ आणि परिस्थिती महत्त्वाची
न्यायमूर्ती जफीर अहमद यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की जा मर हे शब्द कोणत्या परिस्थितीत, कोणत्या प्रसंगी आणि काय विचार करून बोलले गेले हे तपासणे आवश्यक असते. अशा विधानांना प्रत्येक वेळी थेट आत्महत्येची चिथावणी मानता येणार नाही.

गुन्हेगारी हेतू आवश्यक
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आरोपीचा स्पष्ट उद्देश किंवा पीडित व्यक्तीला मृत्यूकडे ढकलण्याची जाणीवपूर्वक केलेली कृती असणे आवश्यक आहे. रागाच्या भरात बोलल्या जाणा-या भावनिक शब्दांमध्ये असा कायदेशीर हेतू नसतो.

वैवाहिक वाद म्हणजे गुन्हेगारी छळ नव्हे
वैवाहिक जीवनातील सर्वसामान्य वाद, टोमणे किंवा भांडणे यामुळे जर जोडीदाराने आत्महत्या केली, तर प्रत्येक प्रकरणात त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही. आत्महत्या ही संबंधित व्यक्तीच्या मानसिक संवेदनशीलतेवरही अवलंबून असते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59

Latest news