21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेश-राजस्थानमध्ये तापमानात वाढ

मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये तापमानात वाढ

थंडीपासून काहीसा दिलासा हिमाचलमध्ये ३ इंच बर्फवृष्टी दिल्लीत धुक्यामुळे १६ विमानांना उशीर

नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमानात वाढ झाल्याने थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. दिल्लीत धुक्यामुळे १६ विमानांना उशीर झाला.

मध्य प्रदेशातील काही शहरे वगळता बहुतांश शहरांमध्ये किमान तापमान १० अंश किंवा त्याहून अधिक झाले आहे. २२ डिसेंबर रोजी भोपाळमध्ये ११.८ अंश सेल्सिअस आणि इंदौरमध्ये १३.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. पुढील तीन दिवस मध्य प्रदेशात असेच वातावरण राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

राजस्थानमध्ये आज अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला. जयपूरमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊसही झाला. जोधपूरमध्ये शुक्रवारी पाऊस झाला. हवामानातील बदलामुळे शेखावती येथील किमान तापमानात ८ अंशांनी वाढ झाली. काल येथील किमान तापमान २.८ अंश होते, ते आज ११ अंशांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील जिस्पा, लोसार, लाहौल व्हॅली आणि रोहतांगमध्ये शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी २ ते ३ इंच बर्फवृष्टी झाली. शनिवार २३ डिसेंबर रोजी हिमाचलच्या ८ जिल्ह्यांमध्ये बर्फवृष्टी अपेक्षित आहे. दरम्यान, पर्यटक मोठ्या संख्येने डोंगराळ भागात जात आहेत. शनिवारी, २३ डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीचे किमान तापमान ९.६ अंश होते. एक दिवस आधी तापमान ६.१ अंश होते. थंडी कमी झाली असली, तरी दिल्लीत दाट धुके कायम आहे. धुक्यामुळे दिल्लीला येणा-या आणि जाणा-या ११ आंतरराष्ट्रीय आणि ५ देशांतर्गत विमानांना आज उशीर झाला.

पुढील २४ तासांत हवामान कसे असेल?
२४ डिसेंबर रोजी लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर राजस्थान आणि त्रिपुराच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR