पुणे : सर्वोच्च न्यायालयाने माजी प्रशिक्षणार्थी कअर अधिकारी पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण देण्याच्या अंतरिम आदेशात वाढ केली असून पुढील सुनावणी आता १७ मार्च रोजी होणार आहे. २०२२ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पात्रता मिळवण्यासाठी पूजा यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे.
सुप्रीम कोर्टात पोहोचल्या पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळणा-या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उत्तर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आणखी वेळ दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही खेडकर यांनीही तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. एएसजी एसव्ही राजू यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला. एएसजी म्हणाले की दोन आठवड्यांचा वेळ आवश्यक आहे. दरम्यान न्यायालयात खेडकर यांच्या वकिलांनी संरक्षण देण्याच्या अंतरिम आदेशात वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांनंतर प्रकरण सूचीबद्ध करण्यास सांगितले आहे. जर त्या तपासात सहकार्य करत असतील तर तो पर्यंत पूजा खेडकर यांना अंतरिम संरक्षण कायम ठेवावे असे न्यायालयाने म्हटले. यावर एएसजी म्हणाले की त्यांचे सहकार्य नंतर जामिनासाठी आधार बनू नये. आम्हाला तपासासाठी बोलावण्यात आले नसून आम्ही येण्यास तयार असल्याचे असे वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी सांगितले. त्यांनी आम्हाला बोलावले नाही. आम्ही एएसजीच्या प्रतिज्ञा पत्राला उत्तर दाखल करणार असल्याचेही वकिलांनी न्यायालयाला सांगितले.