परभणी : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाचा अवमान झाल्या प्रकरणी संतप्त जमावाने त्याच ठिकाणी रास्तारोको करीत स्टेशन परिसरात किरकोळ दगडफेक करण्यात आली. यानंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाचा अवमान एका माथेफीरूने केला. यानंतर तात्काळ त्याच पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र संविधानाचा अवमान झाल्या प्रकरणी रास्ताराको आंदोलन करण्यात आले. या घटनेची चर्चा काही क्षणात शहरात पसरल्यानंतर तणावपुर्व परिस्थिती निर्माण झाली.
त्यानंतर काही जमावाने शहरातील बाजारपेठ बंद करण्यास सुरूवात केली. दरम्यान शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला असून चौका चौकात पोलिस तैनात केले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरिक्षक अशोक घोरबांड तसेच मोंढा पोलिस ठाण्याचे पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.