17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रनागपूरमध्ये भीषण अपघात, १० गायींना चिरडले

नागपूरमध्ये भीषण अपघात, १० गायींना चिरडले

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कोळसा वाहतूक करणा-या ट्रकने गायींना चिरडले. या दुर्दैवी घटनेत आठ ते दहा गायींचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही घटना उमरेड तालुक्यातील बेसूर शिवारात घडली आहे. ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत मोठे नुकसान झाले असून, ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भरधाव ट्रक कोळसा घेऊन समुद्रपूरच्या दिशेने जात असताना उतारावर गाडी न्यूट्रल केली असल्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने सुमारे आठ ते दहा गायींना चिरडले, या घटनेत या गायींचा जागीच मृत्यू झाला. एका गायीची किंमत अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये आहे. यामध्ये गायींच्या मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

नागरिकांमधून संताप
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, ट्रकचालकावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR