29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात

मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात

राठोड दुस-या गाडीत असल्याने बचावले

यवतमाळ : यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाला तेव्हा संजय राठोड त्यांच्या कारमध्ये नव्हते. ते दुस-या एका कारमधून मागून येत होते. त्यांची कार पुढे निघाली होती. हा अपघात यवतमाळमधील कोपरा या गावात गुरुवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताचा प्रभाव इतका प्रचंड होता की त्यात कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये संजय राठोड यांच्या कारचा चालक एअरबॅग्जमुळे बचावला आहे.

कोपरा गावाजवळून कार जात असताना ही दुर्घटना घडली. कारने समोरच्या पिकअप व्हॅनला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. रस्त्यावरून दोन्ही गाड्या वेगाने जात असताना पिकअप व्हॅननं अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून कारची जोरात धडक बसली. या अपघातात पिकअप व्हॅन पलटी झाली. यात पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला असून अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय राठोड त्यांच्या कारमधूनच प्रवास करणार होते. मात्र, ऐनवेळी नियोजन बदलल्यामुळे ते दुस-या एका पाहुण्यांच्या कारमधून निघाले. त्यांची कार पुढे निघाली. अपघात घडल्यानंतर जवळपास १५ ते २० मिनिटांनी संजय राठोड प्रवास करत असलेली कार त्या ठिकाणी पोहोचली. त्यामुळे कार बदलल्यामुळे संजय राठोड थोडक्यात बचावले.

संजय राठोड ३ ऑक्टोबर रोजी यवतमाळहून वाशिममधील पोहरादेवी येथे दौ-यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पोहरादेवीच्या दर्शनासाठी यवतमाळ दौ-यावर येणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी संजय राठोड पोहरादेवीहून परत येत असताना हा अपघात घडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR