39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयजम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू

रामबन : जम्मू-श्रीनगर येथील रामबन जिल्ह्यामध्ये शुक्रवारी भीषण अपघात घडला आहे. श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून एक एसयूव्ही गाडी घसरून दरीत पडली. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर घटनास्थळी पोलिस, बचाव पथक पोहोचून मृतदेह बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक एसयूव्ही गाडी श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून घसरून दरीत पडली. या अपघातात १० लोकांचा मृत्यू झाला. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी श्रीनगर येथून जम्मूला जात होती. मध्यरात्री एकच्या सुमारास रामबन जिल्ह्याच्या बॅटरी चष्मा परिसरात एक एसयूव्ही गाडी ३०० फूट खोल दरीत पडली. यात १० जणांचा मृत्यू झाला असून सर्व प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अधिका-यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे मृतदेह बाहेर काढणे कठीण जात होते. मृतांमध्ये कार चालक जम्मूचे अंब घ्रोथाच्या बलवान सिंह (४७) आणि बिहारचे पश्चिमी चंपारणचे विपीन मुखिया भैरगंग यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR