28.4 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeअंतरराष्ट्रीयदहशतवादी अबु कतालची हत्या

दहशतवादी अबु कतालची हत्या

हाफिज सईदला मोठा झटका भारताच्या शत्रूचा पाकमध्ये खात्मा

लाहोर : लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वाँटेड दहशतवादी अबु कतालची शनिवार रात्री पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. तो एनआयएच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये होता. काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा तो निकटवर्तीय होता. पाकिस्तानच्या झेलम भागता काल रात्री आठ वाजता अबु कतालची हत्या करण्यात आली.

अज्ञात हल्लेखोराने अबु कतालवर अंदाधुंद गोळ्या चालवल्या. यात त्याचा मृत्यू झाला. पीओकेमध्ये बसून तो जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले घडवत होता. हाफिज सईदने जम्मू कश्मीरमध्ये मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची जबाबदारी अबु कतालवर सोपवली होती. हाफिजने कतालला लष्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर बनवले होते. कतालला हाफिजकडून ऑर्डर मिळायच्या. त्यानंतर तो कश्मीरमध्ये मोठे दहशतवादी हल्ले करत होता. ९ जूनला रियासीमध्ये झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. सैन्यासह विविध सुरक्षा यंत्रणांसाठी अबु कताल डोकेदुखी बनला होता.

कुठल्या हल्ल्यात होता हात?
२०२३ साली राजौरी हल्ल्यातील सहभागाप्रकरणी अबु कतालच नाव राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात होते. १ जानेवारी २०२३ ला नागरिकांना लक्ष्य करुन राजौरीच्या ढांगरी गावात दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर दुस-यादिवशी आयईडी स्फोट झाला होता. यात ७ लोकांचा मृत्यू झाला होता. अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते.

कोणाच्या निर्देशावरून लॉजिस्टिक मदत?
या हल्ल्यासंबंधी एनआयएने आपल्या आरोपपत्रात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन हँडलर्सच्या नावाचा समावेश केला होता. यात सैफुल्ला उर्फ साजिद जट्ट उर्फ अली उर्फ हबीबुल्लाह उर्फ नुमान उर्फ लंगडा उर्फ नौमी, मोहम्मद कासिम आणि अबु कताल उर्फ कताल सिंधी अशी त्यांची नाव होती. चौकशीत समोर आले की, अबु कतालच्या निर्देशावरुन दहशतवाद्यांना लॉजिस्टिक मदत मिळाली होती. रियासी हल्ल्यानंतर ढांगरीमध्ये जवळपास तीन महीने दहशतवाद्यांना भोजन, आश्रय आणि अन्य प्रकारची लॉजिस्टिक मदत देण्यात आली.

यात्रेकरुंच्या बसवर केला होता हल्ला
९ जूनला जम्मू-काश्मीरच्या शिव-खोड़ी मंदिरातून परतणा-या यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याचा मास्टरमाइंड अबु कताल होता. त्याशिवाय काश्मीरमध्ये अनेक मोठे हल्ले घडवून आणण्यात त्याचा हात होता. एनआयएने २०२३ सालच्या राजौरी हल्ल्यासाठी अबू कताललाच जबाबदार ठरवले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR