32.8 C
Latur
Thursday, May 8, 2025
Homeउद्योगदेशातील उद्योगांना दहशती धोका

देशातील उद्योगांना दहशती धोका

अंबानी-अदानी यांना सतर्कतेचा इशारा केंद्र सरकारकडून हाय अलर्ट जारी

नवी दिल्ली : गुजरातमधील जामनगर इथे असलेल्या रिलायन्सच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला धोका वाढला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी सीमेजवळील ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांची सुरक्षा वाढवली आहे.

यामध्ये खावडामध्ये बांधण्यात येणारा जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा पार्कसुद्धा समाविष्ट आहे. यामधील एक मोठा भाग अदानी ग्रीनचा असून जामनगरमध्ये जगातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण कारखानासुद्धा आहे. एका वृत्तानुसार खावडा रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि जामनगर रिफायनरीसारख्या ऊर्जा प्रकल्पांवर आधीच सुरक्षा हाय अलर्टवर होती.

आता ऑपरेशन सिंदूरनंतर ती आणखी कडक करण्यात आली आहे.
खावडा प्रकल्पाला जगातील सर्वांत मोठा रिन्यूएबल एनर्जी पार्क म्हटले जाते. याची क्षमता एकूण ४५ गीगावॅट आहे. यातील सर्वांत मोठा भाग अदानी ग्रीनचा आहे, जे ३० गीगावॅटचा प्लांट विकसित करत आहेत. याशिवाय एनटीपीसी आणि गुजरात इंडस्ट्रीज पॉवर कंपनीसुद्धा या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे. हा पार्क कच्छमध्ये भारत-पाकिस्तान सीमेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे.

सीमा सुरक्षा दलद्वारे (बीएसएफ) याची देखरेख केली जाते. जामनगरमधील रिफायनरीसुद्धा हाय अलर्टवर असण्याचे कारण म्हणजे तिथे एअरबेस आहे. हा परिसर सर्वसामान्य विमानांसाठी ‘नो फ्लाय झोन’ आहे. ही रिफायनरी रिलायन्स इंडस्ट्रीजची असून ती जगातील सर्वांत मोठी रिफायनरी मानली जाते. दररोज १४ लाख बॅरल तेल प्रक्रिया करण्याची याची क्षमता आहे.

उद्योग संरक्षणासाठी ठोस धोरण आवश्यक
रिन्यूएबल ऊर्जा संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी अनेक पातळ्यांवर ठोस धोरण आवश्यक असल्याचे हार्टेक ग्रुपचे सीईओ सिमरप्रीत सिंग म्हणाले. यामध्ये सीमा भिंतीसारखी भौतिक सुरक्षा, देखरेख, कर्मचारी आणि सायबर सुरक्षा यांचा समावेश असावा असे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे प्रतिसादाची वेळ कमी ठेवणे, विमा पॉलिसींद्वारे आर्थिक जोखीम व्यवस्थापित करणे आणि नियमित सेफ्टी ड्रिल्ससुद्धा गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR