27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागात शनिवारी दहशतवाद्यांनी एका प्रवासी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले आहेत. गिलगिटहून रावळपिंडीला जाणा-या या बसवर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिलासजवळ हल्ला करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस गिलगिटहून रावळपिंडीला जात होती. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणा-या ट्रकला धडकली. बसमध्ये बहुतेक लोक कोहिस्तान, पेशावर, घिझर, चिलास, रौंदू, स्कर्दू, मानसेहरा, सिंध आणि स्वाबी भागातील होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR