27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रतृतीयपंथीयांना मिळणार मोफत शिक्षण

तृतीयपंथीयांना मिळणार मोफत शिक्षण

मुंबई : राज्यातील तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत उच्चशिक्षण उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाटील यांनी मंगळवारी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत एक राज्यस्तरीय बैठक घेतली होती. यावेळी सार्वजनिक आणि संलग्न विद्यापीठांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटलांनी मांडला. अशा विद्यार्थ्यांच्या ट्युशन फीचा खर्च विद्यापीठांनी करावा असे आवाहन पाटील यांनी केले. याला उपस्थित सर्व कुलगुरूंनी सहमती दर्शवली.

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल आहे. तृतीयपंथीयांचा शिक्षणात समावेश सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती सरकारी अधिका-यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना यावेळी आवाहन केले, की तृतीयपंथी विद्यार्थ्यांसमोर असणारी आव्हाने ओळखून त्यादृष्टीने काम करावे. यामध्ये पायाभूत सुविधांची कमतरता, स्वतंत्र शौचालय नसणे, इतर विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव, गुंडगिरीसारख्या घटना – ज्यामुळे अनेक तृतीयपंथी आपली ओळख लपवतात अशा सर्व आव्हानांचा समावेश असू शकतो
.
या बैठकीमध्ये विद्यापीठांच्या नॅक ग्रेडबाबत देखील चर्चा झाली. यासोबतच, नोकरी किंवा इतर गोष्टींमुळे शिक्षण सोडावे लागलेल्या व्यक्तींसाठी परीक्षाविरहित प्रमाणपत्र-कोर्स तयार करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थितांना केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR