21.9 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाकडून मावळ, रायगडच्या उमेदवारांची घोषणा

ठाकरे गटाकडून मावळ, रायगडच्या उमेदवारांची घोषणा

नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांना भेटी देत आहेत. आज त्यांनी मावळ मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित सभांना संबोधित केले. पनवेलमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनंत गिते यांची उमेदवारी जाहीर केली. दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करून उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि राजधानी आहे. या जिल्ह्यात आपल्या हक्काचा भगवा फडकणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पुन्हा जर का भाजपचे सरकार चुकून निवडून आले तर ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुन्हा येईन म्हणणारे घरी जातात, ते पुन्हा विधानसभेत येऊ शकत नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुन्हा येण्याचा आत्मविश्वास असेल तर पक्ष का फोडत आहात, असा सवाल त्यांनी केला. तुमच्यावरील संकटाच्या काळात उभ्या राहिलेल्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तुम्ही संपवायला निघालात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी प्रहार केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR