25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeपरभणीअंगणवाडी कर्मचा-यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद मोर्चा

अंगणवाडी कर्मचा-यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद मोर्चा

परभणी : अंगणवाडी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत संप व धरणे आंदोलन सुरुच असून याकडे शासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या कार्याध्यक्ष माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि.१७ शहरातील शनिवार बाजारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळी नाद मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर अंगणवाडी कर्मचा-यांच्या कायदेशीर सेवाशर्ती संबंधीच्या मागण्यांसाठी संप सुरु आहे. मात्र महाराष्ट्र राज्य सरकार अत्यल्प वेतनावर काम करणा-या महिला कर्मचा-यांसोबत अत्यंत असंवेदनशील व्यवहार करीत आहे.

ग्रॅच्युईटीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश देखील सरकार पायदळी तुडवित आहे. कामगार संघटनांसोबत झालेल्या वाटाघाटी व चर्चा याबद्दल लेखी आश्वासन सुस्पष्ट देऊन कर्मचा-यांच्या प्रश्नांबद्दल सोडवणुक करण्याची, तोडगा काढण्याची भुमिका घेण्याऐवजी दादागिरीने युनियनबद्दल सरकार भाषा करीत आहे असा आरोपही करण्यात आला आहे. शासनाच्या कार्यपध्दतीचा निषेध नोंदवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कामगार संघटनांच्या विरूध्दचे कारस्थान सत्ताधा‍-यांनी तात्काळ थांबवावे आणि अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात म. रा. अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या कार्याध्यक्ष कॉ. माधुरी क्षीरसागर यांच्यासह अंगणवाडी सेविका व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR