32.1 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeमनोरंजनवयाच्या २६व्या वर्षी फिल्म स्टारने संपवले आयुष्य

वयाच्या २६व्या वर्षी फिल्म स्टारने संपवले आयुष्य

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री स्वत:चं आयुष्य संपवत आहेत. जानेवारी महिन्यात अभिनेत्री थॅना फील्ड्स तिच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळली. तिच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात काग्नी लिन कार्टर हिने वयाच्या ३६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता पुन्हा एका अ‍ॅडल्ट फिल्म अभिनेत्रीने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

दोन अभिनेत्रींनंतर प्रसिद्ध अ‍ॅडल्ट फिल्म अभिनेत्री सोफिया लियोनी हिने देखील स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. सोफिया लियोनी हिने वयाच्या २६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सोफिया लियोनी राहत्या घरात मृत अवस्थेत आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

रिपोर्टनुसार, सोफिया लियोनी हिचे सावत्र वडील मायक रोमेरो यांनी एक स्टेटमेंट जारी करत सोफिया हिच्या निधनाची माहिती दिली आहे. सोफिया हिचे सावत्र वडील म्हणाले, ‘‘सोफियाच्या निधनानंतर तिची आई आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अचानक तिच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर कुटुंबीय आणि तिच्या मित्रांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.’’

सोफिया हिच्या सावत्र वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी सोफिया तिच्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली. सोफियाच्या निधनानंतर पोलिस अधिक चौकशी करत आहेत. सोफिया हिला फिरायला प्रचंड आवडायचे. आपल्यासोबत असलेल्या प्रत्येकाला कसं आनंदी ठेवता येईल याकडे ती अधिक लक्ष द्यायची असे देखील तिचे वडील म्हणाले.
सोफिया लियोनी हिच्या निधनानंतर सोशल मीडियावर संतापाचे वातावरण तयार झाले आहे. कमी वयात अभिनेत्री स्वत:चे आयुष्य का संपवत आहेत. संशयास्पद मृत्यू का होत आहेत? असे प्रश्न नेटक-यांकडून विचारण्यात येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR