35.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeसोलापूरसोलापुरातून राम सातपुते अन् माढ्यातून नाईक-निंबाळकर यांनी भरला अर्ज

सोलापुरातून राम सातपुते अन् माढ्यातून नाईक-निंबाळकर यांनी भरला अर्ज

सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तसेच माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील तसेच नाईक-निंबाळकर यांच्यासोबत आमदार बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील तसेच माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे आदी उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात दाखल झाले असून शहरातून रोड शो सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR