33.2 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षांनी शिंदेचे वकील म्हणून काम केले

विधानसभा अध्यक्षांनी शिंदेचे वकील म्हणून काम केले

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कोर्टाने न्यायाधिकरणाची जबाबदारी दिली होती मात्र त्यांनी शिंदे गटाची वकिली करण्याचे काम काल केले. त्यांचे निकालपत्राचे वाचन करताना एका गद्दार गटाची बाजू मांडत असल्यासारखे दिसत होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवले. राहुल नार्वेकर निकाल देताना भाजपाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागले, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज केली.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. अध्यक्षांनी महाराष्ट्राला अपेक्षित असा मॅचफिक्ंिसगचा निकाल दिला. नार्वेकर हे शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करीत होते. बेईमान गटाची, चोर, पाकिटमार, लफंग्यांची वकिली करावी, अशी पद्धतीचे निकालाचे त्यांनी वाचन केले, अशी टीका राऊत यांनी केली.

श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का?
मुख्यमंत्र्यांनी निकालानंतर घराणेशाहीचा अंत झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावर बोलताना, मग श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही का? असा सवाल केला. त्याला पद देताना माझा मुलगा आहे, त्याला पद द्या, असे सांगून पद घेतले होते. घराणेशाहीवर बोलण्याआधी तुम्ही श्रीकांत शिंदेवर बोला, असे संजय राऊत यांनी सुनावले. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्याकडे घराणेशाही कधीच नव्हती. विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी त्या त्या कुटुंबातील लोक पुढे येतात. लोकांना ते स्वीकारायचे असेल तर ते स्वीकारतात नाही तर त्यांना बाजूला करतात. एकनाथ शिंदे हे भाजपाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. ते महाराष्ट्राच्या मुळावर उठले आहेत. महाराष्ट्र लुटणा-यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येत आहेत त्यांचे ते पुरस्कर्ते आहेत. शिवसेनेला इतिहासजमा करण्याची दिल्लीतील गुजराती टोळीचे मनसुबे आहेत; पण ते शक्य होणार नाही. ज्या प्रमाणे या महाराष्ट्राने औरंगजेबाला गाडले त्या प्रमाणे महाराष्ट्र यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

…आता मणिपूरच्या राम मंदिरातही जा

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौ-यावर येत असून ते काळाराम मंदिरातही जाणार आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही काळाराम मंदिरात जाण्याची योजना आखल्यानंतर भाजपाचे लोक पंतप्रधान मोदींना नाशिकमधील काळाराम मंदिरात आणत आहेत. आता शिवसेना मणिपूरमधील राम मंदिरात जाण्याचाही विचार करीत आहे. मग पंतप्रधान मोदी मणिपूरलाही जाणार का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR