22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात सर्वांत मोठा दुध घोटाळा

राज्यात सर्वांत मोठा दुध घोटाळा

३० रुपये लिटरचे दूध १४३ रुपयांनी विकले पुरावे देणार, रोहित पवारांचा थेट आरोप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शासकीय आश्रम शाळेसाठी वितरित करण्यात येणा-या दुधामध्ये घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी पुराव्यांसह आकडेवारी सादर करुन जादा दराने दूध विकल्याचा आरोप केला आहे. विकास करण्यासाठी तिकडे गेले, असं सांगणा-यांनी हाच विकास करण्यासाठी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार म्हणाले की, राज्यात ५५२ आश्रमशाळा आहेत. आदिवासी समाजातील लहान मुले तिथे शिकतात. राज्य शासन या मुलांच्या भरणपोषणासाठी अडीचशे एमएल दूध दररोज मुलांना देते. तसे जीआरमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. परंतु मागच्या काही दिवसांपासून या दूध वितरणामध्ये घोटाळा झाल्याचे रोहित पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, अज्ञात व्यक्तीने ११ फाईल्स माझ्या कार्यालयात पाठवल्या आहेत. त्यामध्ये विद्यमान सरकारमध्ये झालेल्या घोटाळ्याची संपूर्ण माहिती आहे. दूध वितरणाचा पूर्वीचा करार ५० रुपये लिटरने होता आता १४३ रुपये लिटरने दूध दिले जात आहे. विशेष म्हणजे चांगल्या क्वालिटीचे दूध जास्तीत जास्त ३० रुपये लिटरने मिळते.

आश्रम शाळांमध्ये केला पुरवठा
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात एक प्रायव्हेट कंपनी आहे. त्या कंपनीबोरबर करार करुन कंत्राटदाराने आश्रम शाळेमध्ये दुधाचा पुरवठा केली. शासन आदेशामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला २५० एमएल दूध देणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात २०० एमएल दूध गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना दिले जात आहे. या कंत्राटासाठी ८० कोटी रुपयांची दलाली दिली गेली आहे असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला.

‘ते’ घोटाळयासाठीच तिकडे गेले
दूध घोटाळ्याविषयी पीएमओ आणि सीएमओकडे तक्रार केल्याचे रोहित पवारांनी सांगितले. काही लोकांचे विकासासाठी जाण्याचे आधीच ठरले होते का? कारण ते तिकडे जाण्यापूर्वी दोन-तीन महिने हा व्यवहार झाला आहे, असा आरोप रोहित पवारांनी नाव न घेता केला. जे लोक म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो त्यांनी याबाबत स्पष्टता द्यावी, असे आवाहन रोहित पवारांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR