19 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeमहाराष्ट्रनववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठले मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क

नववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठले मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क

आधी लगीन लोकशाहीचे

पालघर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. नव्वदी पार वृद्धांपासून ते नवमतदार तरुणांपर्यंत सर्वांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये हळदीच्या मंडपातून येऊन एका नववधूने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सायली राजेंद्र वर्तक असे या तरुणीचे नाव आहे.

पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये हळदीच्या मंडपातून येऊन एका नववधूने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सायली राजेंद्र वर्तक (वय २९) वर्षे असे मतदान केलेल्या नववधूचे नाव असून ती एका खाजगी बँकेत मॅनेजर पदावर काम करते. तिने विरार पूर्व फुलपाडा जनकपूर धाम येथील लोकमान्य हिंदी हायस्कूलमधील बुथ केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

सायलीचे लव्ह मॅरेज असून २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूर येथे तिचा विवाह होणार आहे. यावेळी बोलताना सायलीने सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे, तुम्ही देखील तुमचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे सायलीने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR