वाशिम : प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून ८ जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तीन चिमुकल्यांसह एक महिला गंभीर जखमी झाली असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामध्ये एका पिसाळलेल्या कुर्त्याने हैदोस घातल्याचे समोर आले आहे. कुर्त्याने शहरातील विविध भागांमध्ये आठ जणांवर हल्ला करत गंभीर जखमी केले. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून एक ७० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.
या सर्वांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्व रुग्णांना दोन अॅम्बुलन्सने वाशिम येथे पुढील उपचाराकरिता पाठविले आहे. या कुत्र्याने रिसोड शहरातील महात्मा फुले नगर,अहबाब नगर, अमरदास नगर, मूल्लागल्ली येथील नागरिकांना चावा घेतला.