22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रबनावट सही वापरल्याची बाब गंभीर, कठोर कारवाई करणार

बनावट सही वापरल्याची बाब गंभीर, कठोर कारवाई करणार

: अजित पवारांची विधानसभेत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून, राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचा-यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे.

या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR