26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeराष्ट्रीयसीबीआयने केजरीवालांसह इतर आरोपीविरुध्द ‘राऊस एव्हेन्यू’ कोर्टात आरोपपत्र केले दाखल

सीबीआयने केजरीवालांसह इतर आरोपीविरुध्द ‘राऊस एव्हेन्यू’ कोर्टात आरोपपत्र केले दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतरांविरुद्ध अबकारी धोरण प्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित सीबीआयच्या अटकेची मुदत वाढवण्यात आली. या प्रकरणी ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, केजरीवाल यांना आजच्या सुनावणीदरम्यान, तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगातूनच अटक केली होती.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशिवाय माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के कविता हेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. राऊस अव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी ३१ जुलैपर्यंत वाढवली आणि के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीतही ३१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी १२ जुलै रोजी सीबीआयकडून तपास सुरू असलेल्या अबकारी धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी २५ जुलैपर्यंत वाढ केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR