22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुनगंटीवारांच्या बालेकिल्ल्याला किटली, पंजाचे आव्हान!

मुनगंटीवारांच्या बालेकिल्ल्याला किटली, पंजाचे आव्हान!

बल्लारपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या सहा विधानसभा मतदार संघापैकी बल्लारपूर एक आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात यंदा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महायुती सरकारमधील वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवित आहेत. त्यांची मुख्य लढत कॉँग्रेसचे संतोष सिंह रावत यांच्याशी होणार आहे. कॉँग्रेसमध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे आणि प्रकाश पाटील मारकवार अशी दुहेरी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मतविभाजनाचा मोठा धोका आहे. या मतविभाजनाचा फायदा सुधीर मुनगंटीवार यांना होतो का? हा कळीचा मुद्दा आहे.

२००९ पासून सलग तीन वेळा भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा विजय झाला आहे. आता ते चौथ्यांदा निवडणूकीला उभे आहेत. लोकसभा निवडणूकीला चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून त्यांचा पराभव झाला. लोकसभेला स्वत:च्या बल्लारपूर मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार हे ४८ हजार मतांनी पिछाडीवर पडले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत ही पिछाडी भरुन काढण्याचे मोठे आव्हान मुनगंटीवार यांच्या समोर आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ओबीसी मतदारांची लोकसंख्या मोठी आहे. येथील बहुसंख्य असलेला ओबीसी समाज एकवटला आहे. मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका येथेही लोकसभा निवडणूकीत भाजपला बसला होता. आता विधान सभा निवडणूकीतही या वादाचा फटका सत्ताधारी पक्षाला बसू शकतो असे म्हटले जात आहे. कारण मराठ्यांना ओबीसीतून सर्टीफिकेट देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय ओबीसींना आवडलेला नाही. चंद्रपूरातून या निर्णयाला ओबीसींचा सर्वाधिक विरोध झाला होता.

मतविभाजनावर मदार
कॉँग्रेसमध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार अशी दुहेरी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या मतांचे मतविभाजन झाले तर त्याचा फायदा भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना फायदा होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR