जालना : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अंतरवली सराटी येथे बैठका सुरु आहेत. आज अंतरवलीत मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी, स्वत: मराठा आदोलक मनोज जरांगे आणि आनंदराज आंबेडकर आंबेडकर एकत्रित आलेले पाहायला मिळाले. या तिनही नेत्यांमध्ये अंतरवलीत बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांनी जरांगे यांचे कौतुक केले.
मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी म्हणाले, भारताच्या संविधानाप्रमाणे दुसरे कोणते संविधान नाही. संविधानातील प्रत्येक शब्दावर चर्चा होत होती. ती चर्चा त्यांच्या मुलाबाळांसाठी नाही. शेतकरी, मजूर आणि कष्टक-यांसाठी करत होते. भारतातील शोषित समाजाच्या चर्चा पार पडत होती. महाराष्ट्राने यामध्ये लिडिंग रोल घेतला होता. ही बाब महाराष्ट्रातील लोकांना समजली पाहिजे. महाराष्ट्रात महापुरुष जन्माला आले. मी उत्तर प्रदेशचा आहे पण मनोज जरांगेंनी मला मराठी शिकवली, मी जरांगे यांना हिंदी शिकवेन असेही नोमानी म्हणाले.
संपूर्ण देशात मनोज जरांगेंची गरज आहे. त्यामुळे हिंदी शिकणे गरजेचे आहे. मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बोलण्याचा अनुवाद करेन. मनोज जरागेंच्या रुपाने भारताला आधुनिक गांधी-आंबेडकर आणि कलाम मिळणार आहेत असेही नोमानी म्हणाले. दलित, मुस्लीम आणि मराठा एकत्र आलाय हे फायनल…ही आनंदाची वार्ता मराठ्यांमध्ये गेली. मुस्लीम आणि दलित एकत्र आहेत, मराठ्यांचे मतदान विभागले जात होते. आता मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र झाल्याने कुणी आपल्या जागा पाडू शकणार नाही.
नेत्याला आणि पक्षाला मतदान करायचे नाही. आमचा शिक्का चालणारच…तुम्हाला शेतकरी, गोरगरिब ओबीसी, मराठा मोठा करायचाय तर एकही मत वाया जाता कामा नये. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दुस-या दिवशी ३ दिवस सुटी काढायची, गावात मतदानाला यायचे, शांततेत मतदान करायचे आणि माघारी यायचे. ७५ वर्षातून ही संधी मिळाली ती वाया जाऊन द्यायची नाही असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाला केले आहे.