‘एम्स’मध्ये देशातील पहिले ‘पोर्टेबल एमआरआय मशीन’ सुरू!

मुंबई : देशातील आरोग्यसेवेत महत्त्वाचा टप्पा गाठत ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायनन्सेस (एम्स) येथे भारतातील पहिले पोर्टेबल एमआरआय मशीन सुरू करण्यात आले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता गंभीर रुग्णांची मेंदू तपासणी थेट त्यांच्या बेडशेजारीच करता येणार असून उपचार प्रक्रियेत मोठी सुलभता आणि वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सामान्यत: एमआरआय स्कॅनसाठी रुग्णाला विशेष कक्षात हलवावे लागते. विशेषत: आयसीयूमध्ये दाखल असलेल्या किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना हलवणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत नव्याने सुरू करण्यात आलेले पोर्टेबल एमआरआय मशीन मोठा दिलासा देणारे ठरत आहे. हे उपकरण थेट रुग्णाच्या बेडपर्यंत नेऊन तपासणी करता येते, ज्यामुळे रुग्ण हलवण्याची गरजच राहत नाही.

तज्ज्ञांच्या मते हे मशीन ‘अल्ट्रा-लो-फील्ड’ एमआरआय तंत्रज्ञानावर आधारित आहे. पारंपरिक एमआरआय मशीनच्या तुलनेत याची क्षमता काही प्रमाणात कमी असली तरी ते जलद, सुरक्षित आणि वापरण्यास सोपे आहे. विशेषत: स्ट्रोक, मेंदूवरील दुखापत, न्यूरोलॉजिकल आजार आणि स्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांच्या स्थितीचे तात्काळ मूल्यांकन करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तथापि, तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की हे पोर्टेबल एमआरआय मशीन पारंपरिक एमआरआयची पूर्णत: जागा घेणार नाही. सखोल आणि तपशीलवार तपासणीसाठी मोठ्या एमआरआय मशीनची गरज कायम राहणार आहे. मात्र, आपत्कालीन आणि गंभीर परिस्थितीत हे उपकरण एक प्रभावी पूरक साधन म्हणून काम करेल.

आपत्कालीन परिस्थितीत महत्वाची सुविधा
एम्स मधील डॉक्टरांनी सांगितले की या उपकरणामुळे आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. रुग्णाच्या स्थितीचे त्वरित चित्र मिळाल्यामुळे डॉक्टरांना उपचाराची दिशा लगेच ठरवता येईल. विशेषत: मेंदूविकारांमध्ये वेळेचे महत्त्व लक्षात घेता, हे तंत्रज्ञान जीव वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याशिवाय, हे मशीन बालरुग्णांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. लहान मुलांना एमआरआयसाठी हलवताना किंवा त्यांना स्थिर ठेवताना येणा-या अडचणी टाळता येणार आहेत. त्यामुळे बालरुग्णांच्या तपासणी प्रक्रियेतही सुधारणा होणार आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी सकारात्मक बाब
जगातील अनेक प्रगत देशांमध्ये पोर्टेबल एमआरआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू असून भारतात त्याची सुरुवात होणे ही आरोग्य क्षेत्रासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे. यामुळे देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत तांत्रिक प्रगतीला चालना मिळणार असून, भविष्यात इतर रुग्णालयांमध्येही अशा उपकरणांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. एम्समध्ये सुरू करण्यात आलेले हे पोर्टेबल एमआरआय मशीन रुग्णसेवेत मोठा बदल घडवून आणणारे ठरणार असून गंभीर रुग्णांच्या उपचारात नवी दिशा देणारे तंत्रज्ञान म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news